¡Sorpréndeme!

खूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय | Best Solution For Hair Fall Click on Video

2021-09-13 3 Dailymotion

आपल्यापैकी बहुतांश पुरूष केसगळतीमुळे हैराण असतात. इतके की, ही गळती पुढे टकलामध्ये परावर्तीत होते. पण, आता घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.दैनंदिन धावपळ, काळ, काम वेग यांचे बिघडलेले व्यवस्थापन. खाण्या-पिण्याच्या सवयी या सर्वांचा परिणाम म्हणून केसगळतीची समस्या केवळ ज्येष्ठच नव्हे तर, आता तरूणांमध्येही दिसू लागली आहे. पण आता चिंता करण्याची गरज नाही. संशोधकांनी केसगळती आणि टकलावर रामबाण उपाय शोधून काढला
आहे.दक्षिण कोरियातील वैज्ञानिकांनी एक असा बायोकेमिकल पदार्थ निर्माण केला आहे की, जो टक्कल पडक्या डोक्यावर लावला की, तेथे केस उगवायला मदत होते. ते म्हणतात, 'आम्ही एका अशा प्रोटीनचा शोध लावला आहे की, जो केसगळती आटोक्यात आणतो तसेच, नव्याने केसनिर्मिती होण्यासही मोठी मदत करतो. यासोबतच आम्ही असाही एक पदार्थ निर्माण केला आहे की, जो टक्कल पडलेल्या डोक्यावरही केस निर्मिती करू शकतो. 'आम्हाला खात्री आहे की, हा पदार्थ एक अशा प्रकारचे औषध बनविण्यासाठी कामी येईन. जो केवळ केसगळतीच थांबवणार नाही. तर, केस उगवण्यासही मदत करेन. या पदार्थाच्या मदतीने अशा प्रकारचे औषध लवकरच आम्ही निर्माण करू, असा दावाही कॅग यांनी केला आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews